नाशिक (लाईव नाशिक) – नागपूर – रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तालुक्यातील शिरपूर येथे असलेल्या आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर ट्रक चालकांकडून “एंट्री”च्या नावाखाली ५०० रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन जणांना रंगेहाथ पकडले आहे. यात नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकासह दोन खाजगी व्यक्तींचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- योगेश गोविंद खैरनार (वय 46) – मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण
- रा. फ्लॅट नंबर 107, पहिला मजला, रचना युथिका अपार्टमेंट, अमरावती रोड, नागपूर.
- नरेंद्र मोहनलाल गडपायले (वय 63) – खाजगी नोकरी
- रा. बुद्ध विहार मागे, नारायण लॉन्स जवळ, मराळटोली, आझाद वार्ड, गोंदिया.
- आश्लेष विनायक पाचपोर (वय 45) – ड्रायव्हर
- रा. गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजसमोर, गाडगेबाबा मंदिर मागे, गाडगे नगर, अमरावती.
घटनेचा तपशील: दि. 11 एप्रिल 2025 रोजी तक्रारदार यांचा ट्रेलर भंडारा-देवरी मार्गे रायपूरकडे जात असताना शिरपूर तपासणी नाक्यावर नरेंद्र गडपायले याने “एंट्री”च्या नावाखाली ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. ही रक्कम आश्लेष पाचपोर याच्यामार्फत मोटार वाहन निरीक्षक खैरनार यांच्याकडे पोहोचवण्यात आली. विशेष बाब म्हणजे, दोन्ही खाजगी आरोपींची नेमणूक खैरनार यांनी बेकायदेशीररित्या केली होती.
लाचेची रक्कम: ₹५००
लाचेची मागणी व स्वीकृतीची तारीख: 11/04/2025
कारवाईचा तपशील: आरोपी खैरनार यांची अधिकृत नेमणूक नागपूर ग्रामीण आरटीओच्या “इंटरसेप्टर-5 (रस्ता सुरक्षा पथक)” येथे झाली असताना, मौखिक आदेशाने त्यांनी स्वतः शिरपूर तपासणी नाक्यावर हजर राहत खाजगी व्यक्तींमार्फत वाहनचालकांकडून लाच मागवली व स्वीकारली.
सापळा अधिकारी:
श्री. संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक:
- पोलीस हवालदार गणेश निंबाळकर
- पोलीस शिपाई नितीन नेटारे
सध्या तीनही आरोपींविरोधात देवरी पोलीस ठाणे, जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.